मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप अनेक जागांवरून मतभेद सुरु आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री चर्चा झाली.
त्यामुळे तिन्ही पक्षात जागांचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री वर्षा बंगल्यावर अडीच तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी उदय सामंत आणि शंभूराज देसाई हेही उपस्थित असल्याचे वृत्त आहे. महायुतीत अद्याप काही मतदारसंघाबाबत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. या जागांवरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या जागेवर शिंदे गट आग्रही असून, ही जागा शिवसेनेला मिळाल्यास मोठ्या ताकदीने जिंकू, असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे, पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा दोन्ही पक्ष आग्रही असल्याने ही जागा नेमकी कुणाला मिळणार हे पाहावे लागले.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





