| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 17th, 2018

  कुंभारटोली येथील डांबरी रस्ता कामाचे भूमीपूजन

  नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शहरात सध्या विविध रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यांच अंतर्गत कुंभारटोली वस्तीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन शुक्रवार (ता.१६) पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले प्रामुख्याने उपस्थित होते.

  प्रभाग विकास निधीतून हा रस्ता तयार करण्यात येणार असून कुंभार टोली, कलार गल्ली, गवळीपुरा या वस्त्यांच्या रस्त्यांचे काम त्यात अंतर्भूत आहेत. यासाठी नगरसेवक मुन्ना पोकुलवार आणि संजय बंगाले यांनी पुढाकार घेतला आहे. या वस्तीच्या आतील रस्ता तयार करण्यात यावा, याकरीता स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी केली होती.

  आता रस्ता कामाचे भूमीपूजन झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या रस्ता बांधकामाचे कंत्राट ओ.जी.बजाज यांच्याकडे देण्यात आले असल्याची माहिती संजय बंगाले यांनी दिली.

  यावेळी धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, मुन्ना पोकुलवार, किसन गावंडे, अभय दीक्षित, अमर पारधी, गजानन राऊत, सुनील राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145