Published On : Wed, May 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

देवनगर चौक ते तात्या टोपे सभागृहापर्यंतचा रस्ता वाहतूकीस बंद

- ३१ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकाद्वारे देवनगर चौक ते तात्या टोपे सभागृहापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरिता देवनगर चौक ते तात्या टोपे हॉल पर्यंत रस्त्यावरील वाहतुक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. हे आदेश ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अमलांत राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

देवनगर चौक ते तात्या टोपे हॉल पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक तात्या टोपे हॉल कडून आठ रस्ता चौक व ऑरेज सिटी चौक व देवनगर चौकाकडून अजनी चौक व ऑरेज सिटी चौक या रस्त्यांने वळविण्यात आली आहे. तसेच देवनगर चौक ते तात्या टोपे हॉल पर्यंतचा संपूर्ण मार्ग पूर्णतः वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशात या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता फलक लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा वाहतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलिसांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.