Published On : Thu, Aug 1st, 2019

महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा -एसडीओ वंदना सवरंगपते

Advertisement

कामठी : :-महसुल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे .महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे .जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेला आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करून नागरिकांचे समाधान होईल असे संवाद घालावे असे मौलिक प्रतिपादन एसडीओ वंदना सवरंगपते यांनी कामठी तहसील कार्यालयात 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

तर जसे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसेच 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे महसूल वर्ष मानले जाते यानुसार 1 ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे .राज्य शासनाने 11 जुलै 2002 रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले परिपत्रक काढले होते यानंतर दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे .

शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे .जमीन, महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौंणखनिज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही, विविध खात्याची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, अडविलेले रस्ते खुले करणे, पाण्याच्या पाईपलाईनसाठो परवानगी देणे, सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधारकार्ड, विविध सामाजिक योजना , रोजगार हमी योजना आदी महसूल खात्यामार्फतच राबविल्या जातात.

लोकांना विकासात्मक प्रशासन द्यायची जवाबदारी महसूल विभागाची आहे त्यामुळे लोकांच्या महसूल प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात म्हणून सर्वांनी लोकभिमुख काम करण्याकडे कल वाढवावे असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी व्यक्त केले
याप्रसंगी मौदा चे तहसीलदार प्रशांत सांगळे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक पाटील, कामठी तहसील चे नायब तहसिलदार गणेश जगदाडे,नायब तहसीलदार सुनील तरुडकर, नायब तहसीलदार उके, नायब तहसीलदार कावटे, ना त रंजित दुसावार, मौदा नायब तहसीलदार दिनेशराजे निंबाळकर, नायब तहसीलदार नंदेश्वर सहारे, सपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी 1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून सन 2018-19या महसुली वर्षात विशेष उत्कृष्ट शासकीय कार्य केलेल्या नायब तहसीलदार रणजित दुसावार, मंडळ अधिकारी संजय अनवाने,अववल कारकून वर्षा भुजाडे,तलाठी रितेश इंगळे, रमेश हिवरकर,शुद्धोधन काळपांडे, व्यंकटेश बिराजदार,कनिष्ठ लिपिक होटे, शिपाई ऊके, कोतवाल हर्षल ठवकर, सचिन उईके,प्रशांत सहारे, वर्षा भुजाडे या महसूल आधीकारी कर्मचाऱ्यांचा एसडिओ वंदना सवरंगपते , तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

1 ऑगस्ट महसूल दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात अववल कारकून तडस, अमोल पौड,शेख शरीफ, दिनकर गोरले, राम उरकुडे,मंडळ अधिकारी संजय अनवणे, मंडळ अधिकारी महेश कुलदिवार, मंडळ अधिकारी संजय कांबळे, ओमदेव लांजेवार, तलाठी आशिष गोगलवार, , राहूल भुजाडे, प्रशांत सहारे,नितीन उमरेडकर, योगेश गुप्ता, रितेश इंगळे, लाडे , वर्षा भुजाडे आदी अधिकारी कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारि महेश कुलदिवार यांनी केले तर आभार राहुल भुजाडे यांनी मानले.

संदीप कांबळे कामठी