नागपूर: शहरातील ओंकारनगर परिसरात काही दिवसांपूर्वी ऑटोरिक्षा चालकाने एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली.याप्रकरणी अजनी पोलिसांनी नराधम ऑटोरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांच्या शिफारशीवरून पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या ऑटोरिक्षा चालकाचा परवाना निलंबन आणि ऑटोरिक्षाची नोंदणी रद्दबाबत नोटीस बजावली असून यासंदर्भात मोठी कारवाई काण्यात येणार आहे.
माहितीनुसार, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सोमवारी आरोपी ऑटोरिक्षा चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली.यात परिवहन अधिकाऱ्यानी अजनी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाचा संदर्भ देत ऑटोरिक्षा चालकाने या कृत्यातून कोणत्या मोटार वाहन नियमांचा भंग केला त्याबाबत सांगण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सात दिवसांच्या आत आरोपीने आरटीओला प्रत्यक्ष हजर राहून अथवा लेखी उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले.
अजनी पोलिसांनी पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सदर ऑटोरिक्षा चालकाचा परवाना निलंबित व वाहनाची नोंदणी रद्द करण्यासाठी शिफारीश करणारे पत्र पाठवले. या पत्राची दखल घेत आरटीओ कार्यालयाकडून आरोपी ऑटोरिक्षा चालकाला परवना निलंबन व वाहनाचे नोंदणी रद्दबाबत नोटीस बजावण्यात आली.लवकरच यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
Published On :
Tue, May 14th, 2024
By Nagpur Today