मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी संसदेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणेंनी यांनी भावनिक पोस्ट केली. तुम्हाला सगळी पदं सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातील खरा माणूस अनेकांना कळाला नाही.
अशा भावना निलेश राणेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली. खासदारकीची पाच वर्षे जीव तुम्ही तोडून काम करणार असल्याचेही निलेश राणे म्हणाले.
1958 नगरसेवक, 1990 ते 2014 सलग सहा वेळा आमदार (1 पोटनिवडणूक), 2014 ते 2024 विधानपरिषद 1 वेळा, राज्यसभा 1 वेळा आणि 2024 आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही.तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळले नाही पण तुम्हाला जरी नाही कळले तरी ते आम्हाला दिसले. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणे सोप्प नाही.
जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजले. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार.तुम्ही आहात म्हणून हे सगळे शक्य आहे.