Published On : Sat, Apr 3rd, 2021

विकासाचे खरे भगीरथ नितीनजी गडकरी

Advertisement

– राज्याला 4590 कोटी तर नागपूरला 500 कोटी ,विकासाचे महामेरू नितीनजींचे त्रिवार अभिनंदन व आभार

नागपूर : केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांनी महाराष्ट्र राज्याला सतत 7 वर्षापासून विकासाची दिशा तेजगतीने वाढविण्याच्या दृष्टीकोनातून नागपूर शहर आंतरराष्ट्रीय दर्जावर व भारताच्या नकाशावर नंबर वन कसे राहील, या दृष्टीने शहराच्या चारही दिशेने मोठमोठे प्रोजेक्ट, रस्ते, मेट्रो व अन्य विकासकामाच्या माध्यमातून विकासाचा सपाटा लावला. नागपुरात जे 50 वर्षात होऊ शकले नाही, ते या 7 वर्षाच्या कालकीर्दीत नितीनजीनी करून दाखविले व त्यांच्याच प्रयत्नामुळे आज नागपूर शहरात अनेक विकासकामे मोठ्या जोमाने सुरु आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावर्षी सन 2020-21 मध्ये राज्यासाठी 4590 कोटी रुपयाचे कामाला मान्यता दिली तर शहराच्या विकासाला 500 कोटी निधी देऊन विकासाचे खरे भगीरथ होण्याचा मान गडकरी साहेबांना मिळालेला आहे. याच शहरात तब्बल 72 हजार कोटीची विकासकामे गडकरी साहेबांच्या माध्यमातून सुरु असून यात मेट्रो रेल्वे, नाग नदी पुनरुज्जीवन, सिम्बायोसिस, साई क्रिडा संकुल, लॉ कॉलेज, स्मार्ट सिटी प्रकल्प, अमृत योजना, आर.टी.ओ., अनेक उड्डाणपूल, झोपडपट्टी पट्टेवाटप, कँसर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल असे अनेक प्रोजेक्ट आणून विकासाचा महामेरू म्हणून ख्याती प्राप्त करणारे नितीनजी गडकरी यांना नागपुरातील जनतेच्या वतीने त्रिवार अभिनंदन व आभार

नागपूरचे तिन्ही मंत्री राऊत-केदार-देशमुख विकासात नापास, गडकरी-फडणवीस-बावनकुळे यांचा सल्ला घ्या
राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे हे राज्यातील पहिले अपयशी मुख्यमंत्री ठरले असून विकासकामे / कोरोना उपाययोजनेमध्ये देखील फेल ठरले आहे. नागपूरचे तिन्ही मंत्री हे अपघाताने मंत्री झाले असून या दिड वर्षाच्या कालावधीत एकही रुपया नागपूरच्या विकासासाठी ते आणू शकले नाही. उलट नागपूर जिल्ह्याचा डी.पी.सी. चा निधी पळवून नेण्याचे कारस्थान या मंत्र्याच्या उपस्थितीत झाले आहे. त्यामुळे तिन्ही मंत्री विकासकामात पूर्णपाने अपयशी ठरल्याची नोंद आहे.

या तिन्ही मंत्र्यांनी समझत नसेल तर गडकरी-फडणवीस-बावनकुळे यांचा सल्ला घेऊन विकासकामे काशी करावी व शहराचे चित्र कसे बदलावे. हे शिकावे. कारण 2014 नंतर शहराचा विकास ज्या झपाट्याने गडकरी-फडणवीस यांचा नेतृत्वात झाला हे जनतेने पाहिले आहे. परंतु हे तिन्ही मंत्री सर्व स्तरावर नापास झाले असून यांनी गडकरी-फडणवीस-बावनकुळे यांच्याकडे अभ्यासवर्ग लावावा, असा सुचक सल्ला आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement