Published On : Tue, May 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची गाडी फिरवणारा पोलिस कॉन्स्टेबल निलंबित !

Advertisement

नागपुर : सिव्हिल लाईन्स येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बंगल्यावर नाईट गार्ड म्हणून तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमित झील्पे कोणतीही परवानगी न घेता रात्री उशिरा न्यायाधीशांच्या गाडीतून फिरायला गेले. यादरम्यान रस्त्याच्या कडेला एका खांबाला गाडी धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर झील्पे यांनी शांततेत कर बंगल्याबाहेर आणून उभी केली. सकाळ झाल्यावर कारची दुरावस्था पाहून हा प्रकार उघडकीस आला. यानंतर परिसरातील फुटेज तपासण्यात आले. अमित झील्पे यांनी हे कृत्य केल्याचे निदर्शनास आले.

हे प्रकरण पोलिस आयुक्तालयापर्यंत पोहोचले. आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले.याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हवालदार अमित झील्पे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आणि त्यांना निलंबितही केले आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यापूर्वी कळमना मार्केटमध्ये निवडणुकीनंतर ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्राँग रूममध्ये गडबड केल्याचा आरोप या हवालदारावर करण्यात आला होता. या प्रकरणाची चर्चा रंगली होती.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले झील्पे हे सदर भागातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शासकीय बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. 5 एप्रिल 2023 रोजी झील्पे यांनी न्यायाधीशांच्या गाडीची चावी चोरली आणि मध्यरात्री कारमधून शहरात फिरत होते. दोन तास कारने प्रवास करून ते बंगल्याकडे परतत असताना वायूसेना नगर येथे भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकली. त्यानंतर अपघातग्रस्त कार घेऊन अमित तत्काळ बंगल्यावर पोहोचले गाडी पार्किंगमध्ये ठेवून निघून गेला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांचा चालक आल्यावर ही बाब उघडकीस आली.

Advertisement

अमित झील्पे यांच्या पगारातून सुमारे 2 लाख 28 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून वसूल केले जाणार आहेत. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत पोलीस आयुक्तांनी अशा चुका करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

Advertisement
अमरावती में कांग्रेस का जोरदार विरोध प्रदर्शन #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtranews

अमरावती में कांग्रेस का जोरदार विरोध प्रदर्शन #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtranews

छात्रों का मुद्दा उठते ही भावुक हुए अन्ना हजारे! #AnnaHazare #Maharashtra #Protest #Education #News

छात्रों का मुद्दा उठते ही भावुक हुए अन्ना हजारे! #AnnaHazare #Maharashtra #Protest...

नागपुर में एंटी नारकोटिक्स टीम का बड़ा एक्शन! #NagpurNews  #MDDrugs #AntiNarcotics #CrimeNews

नागपुर में एंटी नारकोटिक्स टीम का बड़ा एक्शन! #NagpurNews #MDDrugs #AntiNarcotics #CrimeNews

छात्रों पर लाठीचार्ज के विरोध में जालना बंद #maharashtra #jalna #newsupdate #maharashtra #news

छात्रों पर लाठीचार्ज के विरोध में जालना बंद #maharashtra #jalna #newsupdate #maharashtra...

शिरपुर में छात्रों का जोरदार विरोध प्रदर्शन #JantarMantar #Protest  #CBIInquiry #MaharashtraNews

शिरपुर में छात्रों का जोरदार विरोध प्रदर्शन #JantarMantar #Protest #CBIInquiry #MaharashtraNews

शेवगांव बंद को मिला व्यापक जनसमर्थन #maharashtranews #ahilyanagar #newsupdates #maharashtra

शेवगांव बंद को मिला व्यापक जनसमर्थन #maharashtranews #ahilyanagar #newsupdates #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges