बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड मधील आरोपिंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असुन नागपुरात चालत असलेला खटला देशातील दूसऱ्या राज्यात चालविन्या करीता माननीय सर्वोच्च न्यायालयात ट्रांसफर पिटीशन दाखल केलेली आहे .आरोपिंनी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब (DJ- 9)यांच्या वर असे आरोप केले की ते राजकीय दबावात कांबळे दुहेरी हत्याकांड हा खटला चालवित आहे .
माननीय सर्वोच्च न्यायालयात ट्रांसफर याचिका आरोपिच्या वतीने दाखल झाली असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पोलीस खात्यावर जवाबदारी आलेली असुन नागपुर चे पोलिस आयुक्त व तपास अधिकारी यावर काय भूमिका घेतिल ? यावर सर्वांचे लक्ष वेधुन आहे .
माननीय सर्वोच्च न्यायालयात ट्रांसफर याचिका आरोपिच्या वतीने दाखल केली आहे व त्याचा डायरी नंबर अर्ज़ामध्ये नमुद करुण आरोपिच्या वकीलानी पुन्हा न्यायालयात चार्ज फ्रेमिंग टाळण्याकरीता वेळ मागितला .
आरोपींना सर्वोच्च न्यायालय उपरोक्त संधी मिळावी म्हणुन माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब (DJ- 9)यांनी आरोपीना 15 दिवसात सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया करण्याकरिता वेळ दिला .
आरोपीच्या वतीने माननीय न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब व पोलिस यांच्यावर थेट आरोप लाऊन आरोपीनी सर्वोच्च न्यायालयात ट्रांसफर याचिका दाखल केली आहे. ही बाब सर्वांसाठी धक्कादायक आहे.
सरकारतर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितिन तेलगोटे (DGP)साहेब, आरोपी तर्फे देवेंद्र चव्हाण व फिर्यादि तर्फे समीर सोनवणे यांनी बाजु मांडली