Published On : Fri, Apr 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

कोण असली-नकली हे जनता ठरवेल; जयंत पाटलांचा अमित शहांना टोला

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रचारसभेत भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे ते म्हणाले होते. यावरही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि मग आपण त्यातल्या एकाला नकली म्हणायचे. ज्यांनी फोडा-फोड केली त्यांनीच त्यात कोण असली आणि कोण नकली ठरवणं योग्य नाही. खरंतर कोण असली, कोण नकली, हे महाराष्ट्रातील जनताच ठरवेल, असे जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार एनडीएत सहभागी होण्यासाठी तयार होते. या दाव्यावर जयंत पाटील यांनी भाष्य केले.

Advertisement

अजित पवार गटात असलेल्या नेत्यांचे प्रयत्न होते की शरद पवारांना एनडीएत घेऊन जायचे. शरद पवार जर तयार असते, तर एनडीएत गेलेच असते.पण ते कधीच तयार नव्हते. शरद पवार यांनी भाजपाची विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. मात्र पक्ष फुटला तरी शरद पवार यांनी विचारधारा न सोडण्याचा निर्णय घेतला,असे जयंत पाटील म्हणाले.