Published On : Tue, Jul 3rd, 2018

अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. रेल्वे ट्रॅकवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

या घटनेमुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणार वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे.

अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 7.35 वाजण्याच्या सुमारास गोखले पूल कोसळला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.