Published On : Mon, Jun 28th, 2021

सलग ११ दिवसांपासून शहरात कोरोना मृत्यूचा आकडा शून्य

कोविड चाचण्यांनी ओलांडला २.४४ लाखांचा उंबरठा

चंद्रपूर : मागील ११ दिवसांत जिल्ह्यात ४ हजार १७१ व्यक्तींची कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ६८ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे असले, तरी मागील ११ दिवसांत शहरात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे मनपाच्या आरोग्य यंत्रणेला कोविड मृत्यू रोखण्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

आतापर्यंत शहरात एकूण कोविड मृतांची संख्या ४२५ वर स्थिरावली आहे. सध्या शहरात ५५ रुग्ण पॉझिटिव्ह असून, त्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहेत. १८ जून ते २८ जून २०२१ या दरम्यान शहरात एकही मृत्यूची नोंद नाही. २८ जून रोजी एका बधिताची नोंद झाली, यासोबतच आतापर्यंत एकूण २५ हजार ४६१ बधितांची नोंद झाली आहे. तसेच सोमवारी १२ रुग्ण बरे झाले.

चाचण्यांनी ओलांडला २.४४ लाखांचा उंबरठा
शहरात आतापर्यंत २ लाख ४४ हजार ११४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख १८ हजार ६५३ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह, तर २५ हजार ४६१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दिवस निहाय चाचण्या आणि रुग्ण
दिनांक चाचण्या रुग्ण
१८ जून ९३९ ११
१९ जून ५०४ १३
२० जून ३५४ १४
२१ जून २६८ ०४
२२ जून ३५२ ०६
२३ जून ३७२ ०२
२४ जून ३४८ ०५
२५ जून २९० ०७
२६ जून ३८० ०१
२७ जून १३२ ०४
२८ जून २३२ ०१
======================
एकूण ४,१७१ ६८

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement