Published On : Thu, Apr 9th, 2020

मांग गारोडी समाजातील गरजुना शासनाने त्वरित मदत करावी- पात्रे

कन्हान : – मांग गारोडी समाजातील अंत्यत गरजुवर लॉकडॉऊन मुळे उपास मारीची पाळी आल्याने शासना व्दारे जीवनाश्यक अन्नधान्याची त्वरित मदत करून हयाना जगविण्यात यावे अशी मागणी अ भा मांग गारोडी आदिवासी भटके संघर्ष समिती विदर्भ प्रदेश अध्यक्ष नेवालाल पात्रे हयानी केली आहे.

कोरोणा विषाणु चा प्रादुर्भाव रोख ण्याकरिता संपुर्ण देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आल्याने मिळेल ते काम करून पोट भरणा-याना भयंकर हालअपेष्टा सहन करून बेहाल होत आहे. कन्हान शहरातील यशवंत नगर, रामटेक रेल्वे फाटक, कुशाजी नगर, एम जी नगर, विष्णुलक्ष्मी नगर, वाघधरेवाडी, तारसा रोड, स्वामी विवेकांनद नगर, पटेल नगर, पिपरी, खंडेलवाल नगर, सत्रापुर येथे मोठया प्रमाणात मांग गारोडी समाज बांधव वास्तव करित असुन पारंपारिक मालीश करणे, बुट पॉलीस करणे, म्हशी भादरणे, अस्वच्छ तेचे काम, भंगार वेचने आदी कामे महिला, पुरूष करित असुन रोजच्या मिळकतीवर आपल्या परिवाचा उदरनि र्वाह करतात. आता चौदा दिवस कसेतरी मदतगार सामजिक संस्था, व्यक्तीच्या मदतीने निघले.

परंतु अशी मदत किती मिळणार, कधी कधी उपासी सुध्दा राहावे लागत असुन उपासमारीची पाळी समाजाच्या नागरिकांवर येऊन ठेपली असल्याने सरकार व शासनाच्या घोषणे प्रमाणे या मांग गारोडी समाजाच्या अंत्यत गरजुना जगण्याकरिता जिवना श्यक अन्न धान्य पुरवठा शासनाव्दारे त्याच्या घरी त्वरित करून या गरजु कुंटुबाना जगविण्याची मागणी मा वरूण कुमार सहारे तहसिलदार पारशिवनी हयाना व्हॉटशाप वर निवेदन पाठवुन शासनास अखिल भारतीय मांग गारोडी आदिवासी भटके संघर्ष समिती विदर्भ प्रदेश अध्यक्ष नेवालाल पात्रे हयानी केली आहे.