Published On : Fri, Apr 18th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर खंडपीठाकडून नोटीस; ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश

Advertisement

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली असून, त्यांना ८ मेपर्यंत आपले उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या २६ उमेदवारांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला न्यायालयात आव्हान दिले आहे.

या याचिकांमध्ये काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी हा पराभव न्यायालयात आव्हान दिला आहे.

बुधवारी न्यायालयाने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कायंदे आणि भाजपचे देवराव भोंगले यांना देखील समन्स बजावले. गुरुवारी भाजपचे मोहन मते आणि चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनाही नोटीस पाठवण्यात आली.

याचिकाकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील ईव्हीएम वापराबाबत गंभीर आरोप केले असून, निवडणूक आयोगाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया न पाळता निवडणूक घेतल्याचा दावा केला आहे. तसेच पराभूत उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म क्रमांक १७ न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी निवडणूक आयोग आणि इतर प्रतिवाद्यांचे नावे वगळून फक्त विजयी उमेदवारांना नोटीस बजावल्या आहेत. मते यांना ६ मेपर्यंत तर भांगडिया यांना ८ मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधीत्व अॅड. आकाश मून यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.