Published On : Thu, Jun 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या वृक्षारोपण अभियानाला मिळाली नागरिकांची साथ

मनपाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

नागपूर,: नागपूर महानगरपालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम 2.O’ अभियानांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. मनपाच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या अभियानाला भरभरून साथ दिली.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या हस्ते गोरेवाडा परिसरात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते भांडेवाडी येथे वृक्षारोपण करून ‘एक पेड माँ के नाम 2.O’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तर सर्व झोनच्या सहायक आयुक्तांनी संबंधित झोन मध्ये वृक्षारोपण करीत अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी मनपाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला. मनपाचे दहाही झोन कार्यालय, मनपाच्या शाळा, सर्व उद्याने, अग्निशमन केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.


मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसूमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. मुख्य कार्यक्रम गोरेवाडा परिसरात आयोजित करण्यात आला. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त श्री. गणेश राठोड, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तर अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते भांडेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, समाज कल्याण विभागाच्या श्रीमती नूतन मोरे, श्रीमती जयश्री गडकर, श्री विनय त्रिकोलवार, श्री. रितेश बांते, श्री. प्रमोद खोब्रागडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

मनपाच्या झोन कार्यालयाद्वारे शहरातील नवनिर्माणनगर मैदान, मरार टोली मैदान, गोकुळपेठ मार्केट, माऊली नगर नाला, मानेवाडा घाट, गीता नगर मैदान, मोक्षधाम घाट, नरेंद्र नगर हजरी स्टँड, विरंगुळा केंद्र दर्शन कॉलनी, सक्करदरा उड्डाण पूल, ताजबाग उर्दू हायस्कूल, सी.पी.अँड बेरार महाविद्यालय चौक, नाईक तलाव परिसर, बाबुलबन अग्निशमन केंद्र कार्यालय परिसर, प्रियदर्शिनी गरोबा मैदान एनआयटी मैदान बाबुलबन, कपिल नगर मनपा शाळा, बोरगाव नाका, आदी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय आयईसी चमूने दुपारी संविधान चौकात प्ले कार्डच्या माध्यमातून वाहनचालकांना पर्यावरण संवर्धनासाठी जागृत केले. यात चमूच्या सदस्यांनी विविध जलचर प्राण्याचे चित्र हाती घेऊन नागरिकांना घातक प्लास्टिक विषयी माहिती दिली. मनपाद्वारे शहरात पशूपक्ष्यांचा अधिवास वाढेल अशा वृक्षरोपांची लागवड करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.