Published On : Sat, Jun 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मनपाने केली 13 हजारांच्यावर दुचाकी अन् 4 हजारांच्यावर चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय

स्ट्रीट पार्किंग’ ला वाहन चालकांचा उत्तम प्रतिसाद मनपाने शहरातील प्रमुख मार्गांवर निश्चित केल्या वाहन ‘पार्किंग’ जागा
Advertisement

नागपूर : शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना शिस्तबद्ध पार्किंगची सवय लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर ‘स्ट्रीट पार्किंग’ साठी ५१ जागा निश्चित करून पार्किंगची जागा अधोरेखित व्हावी, याकरिता त्यावर पांढऱ्या रंगाचा लहान पट्टी रेखांकित करण्यात आल्या आहेत. मनपाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला वाहनचालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाद्वारे शहरतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी प्रत्यत्न केले जात आहेत. यापूर्वी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्यासह शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन पार्किंगच्या संदर्भात पाहणी केली होती. तसेच रस्त्यांवर पार्किंग साठी पांढऱ्या रंगाच्या लहान पट्ट्या रेखांकित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शहरातील ७५ प्रमुख रस्त्यांवर ‘स्ट्रीट पार्किंग’ साठी सर्वेक्षण करण्यात आले. यातील ५१ जागा पार्किंगसाठी सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. यावर जवळपास १३ हजार ५०० दुचाकी वाहन आणि ४ हजार चारचाकी वाहनांना पार्क करण्यासाची सोय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी मोठ्या रोडसाठी तिरप्या रेषा (एन्गुलर) व लहान मार्गासाठी समांतर पार्किंग (पॅरलर) रेखांकित करण्यात आली आहे. यात दुचाकी वाहनासाठी १ बाय २.५ मीटर पासून चारचाकी वाहनांसाठी ५ बाय २.५ मीटर अंतर ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे रस्त्यांवर अव्यवस्थितपणे पार्क वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय नागरिकांना निश्चित केलेल्या ठिकाणीच वाहने पार्क करण्याची सवय लागेल, तसेच रस्त्यावर मोकळी जागा उपलब्ध झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरी नागरिकांनी या निश्चित केलेल्या पार्किंग जागांचा योग्य वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करून शहराच्या विकासात सहकार्य करावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंधाडे यांनी दिली.

मनपाने शहराच्या विविध भागांतील महत्त्वाच्या मार्गांवर पार्किंगसाठी जागा निश्चित केल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे आहेत:

Advertisement

माटे चौक ते प्रताप नगर चौक, भाजीमंडी चौक ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, प्रताप नगर चौक ते मंगलमूर्ती चौक, बजाज नगर चौक ते दीनदयाल उपाध्याय चौक ते आठ रस्ता चौक, आठ रास्ता चौक ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, छत्रपती चौक ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल, ऑरेंज सिटी हॉस्पिटल ते प्रताप नगर चौक, ऑरेंज सिटी हॉस्पिटल ते आरपीटीएस चौक, मंगलमूर्ती चौक ते लंडन स्ट्रीट चौक, मनपा धंतोली झोन कार्यालय ते काँग्रेस नगर टी-पॉइंट, लोकमत चौक ते कृषी मुलांचे वसतिगृह, कृषी मुलांचे वसतिगृह ते अलंकार चौक, रवी नगर चौक ते रामनगर रोटरी, मेट्रो रेल हाऊस ते व्हीसीए ग्राउंड चौक, लक्ष्मी भवन चौक ते रामनगर रोटरी, लेडीज क्लब चौक ते आकाशवाणी चौक, डॉ. पंजाबराव देशमुख चौक ते व्हीसीए स्टेडियम चौक, लक्ष्मी भवन ते शंकर नगर चौक, मनपा समोरील रस्ता (बाटा शॉप ते क्रॉसवर्ड शॉप), जनरल आवारी चौक ते रेशीमबाग चौक, मेडिकल स्क्वेअर ते क्रीडा चौकपर्यंत, भांडे प्लॉट चौक ते तुकडोजी चौक, मेडिकल चौक ते माता मंदिर, मानेवाडा चौक ते तुकडोजी चौक, तुकडोजी चौक ते राजकमल चौक, एसडी हॉस्पिटल चौक ते गुरुदेव नगर चौक मार्गे संगम टॉकीज, तिरंगा चौक, कामगार नगर चौक ते आग्याराम देवी चौक, आग्याराम देवी चौक ते कापूस बाजार, मेडिकल स्क्वेअरपासून पश्चिमेकडे (रस्त्याचा शेवटचा टोक), कामगार नगर चौक ते मेडिकल चौक, मेडिकल चौक ते अशोक चौक, मेडिकल चौक ते मेडिकल कॉलेज प्रवेशद्वार, चंद्रमणी चौक ते रामेश्वरी चौक ते शताब्दी चौक, वैद्यनाथ चौकापासून अशोक नगर चौकापर्यंत, तिरंगा चौक ते सक्करधारा रोड, जगनाडे चौकापासून टी-पॉइंट (मिडल रिंग रोड) पर्यंत, भांडे प्लॉट चौक ते जगनाडे चौक, जगनाडे चौक ते इतवारी टेलिफोन एक्सचेंज चौक, चिटणीस पार्क चौक ते रेल्वे स्टेशन टी-पॉइंट, राणी दुर्गावती चौक ते मारवाडी चौक, टेलिफोन एक्सचेंज ते छपरू नगर चौक, छपरू नगर ते आंबेडकर चौक, आंबेडकर ते वैष्णोदेवी चौक, वैष्णोदेवी ते प्रजापती चौक, वर्धमान चौक ते शिवाजी चौक, वर्धमान चौक ते रेल्वे क्रॉसिंग, शिवाजी चौक ते भीम चौक, वैष्णोदेवी चौक ते शास्त्रीनगर चौक, कमल चौक ते वैशाली नगर, छावणी टी-पॉइंट ते ताज औलिया बाबा चौक, छावणी टी-पॉइंट ते काटोल रोड सब पोस्ट ऑफिस जंक्शन, जरीपटका पोलीस स्टेशन ते भीम चौक येथे जागा रेखांकित करण्यात आल्या आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.