Published On : Thu, Mar 8th, 2018

महिलांचा सर्वाधिक छळ व्यसनाधीन व्यक्तींद्वाराच! – सुजाता सन्याल

Advertisement


नागपूर: पुरुषांपेक्षाही महिला कतृत्ववान आहेत हे वारंवार सिद्ध झाले. परंतु त्यांना सन्मानाने वागणूक मिळत नाही. व्यसनाधीन व्यक्तींकडून सर्वाधिक छळ हा पत्नी, आई आणि मुलीचा होतो. ही शोकांतिका असून यात सुधारणा न झाल्यास देश कधीही यशोशिखर गाठू शकणार नाही. तुम्ही आनंदी राहा आणि कुटुंबासही आनंदी ठेवा असे विचार नारायण विद्यालय कोराडीच्या समन्वयक सुजाता सन्याल यांनी व्यक्त केले.

सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र, दाभा नागपूर येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी सन्याल बोलत होत्या. कार्यक्रमाला अतिथी म्हणून एलएडी महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. रुता धर्माधिकारी, मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या मुख्याध्यापिका मंगला समर्थ उपस्थि होत्या.

या प्रसंगी डॉ. रुता धर्माधिकारी शिबिरार्थ्यांना म्हणाल्या, आपल्या मनात एखद्या गोष्टीची भिती तयार झाली की आपले मन क्रोधाकडे वळते आणि त्यातून व्यक्ती व्यसनाकडे वळतो. त्याचे दुष्परिणाम कुटुंबाला, समाजाला भोगावे लागतात. महिलांचा सन्मान करा अन्यथा तुमचाही कोणी सन्मान करणार नाही. मंगला समथर्त यांनी केवळ महिला दिनीच महिलेची आठवण आणि शुभेच्छा नकोत. त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे. ज्यांच्यामुळे मुले घडतात त्या महिलांवर केवळ आजच्या दिवशीच शुभेच्छांचा वर्षाव नको तर वर्षभर त्यांना सन्मान देण्याची शपथ घ्या. असे आवाहन त्यांनी व्यसनाधीन तरुणांना केले. केंद्राच्या समुपदेशन संचालिका डॉ. शर्मिष्ठा गुप्ता यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रशासकीय प्रमुख वेरुंजली कंगाले यांनी पाहुण्याचे आभार मानले