Published On : Thu, May 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

मोदी सरकारची आरक्षण हटाओ मोहिम म्हणजे ,’न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी’; राहुल गांधींचा हल्लाबोल

Advertisement

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींच्या आरक्षण हटाओ मोहिमेचा मंत्र म्हणजे, न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी, म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही.भाजपा सरकार खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या काढून दलित,आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण छुप्या पद्धतीने हिसकावून घेत आहे,

असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. 2013 मध्ये पब्लिक सेक्टरमध्ये 14 लाख कायमस्वरूपी पदं होती, त्यापैकी 2023 पर्यंत केवळ 8.4 लाख पदे उरली आहेत. बीएसएनएल, सेल, भेल यांसारख्या आघाडीच्या सार्वजनिक उपक्रमांना उद्ध्वस्त करून फक्त पब्लिक सेक्टरमधील जवळपास 6 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या नष्ट झाल्या आहेत. ही एकमेव पदं आहेत जिथे आरक्षणाचा लाभ मिळतो.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे की आम्ही पब्लिक सेक्टर्स मजबूत करू आणि 30 लाख रिक्त सरकारी पदं भरून समाजातील प्रत्येक घटकासाठी रोजगाराची दारं खुली करू. यासोबतच परीक्षा घेण्यापासून ते भरतीपर्यंतची निश्चित कालमर्यादा असेल,असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

Advertisement
Advertisement