Published On : Fri, Jun 12th, 2020

मार्च महिन्यानंतर सभाच झाली नाही

कामठी :-पावसाळा तोंडावर आला असताना नागरिकांच्या समस्या ह्या वाढीवर राहणार अशा स्थितीत स्थानिक नगरसेवकालाच नागरिकांच्या समस्येला तोंड द्यावे लागनार आहे मात्र मार्च महिन्यानंतर कामठी नगर परिषद ची सर्वसाधारण सभा झालीच नसल्याने मान्सून काळातील नियोजन हे थंडबसत्यात असल्याचे दिसून येते.

दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक असताना मागील मार्च महिन्या नंतर कामठी नगर परिषद ची सभाच झाली नाही .मार्च महिन्याच्या सुरुवातीला सर्वसाधारण सभा झाली मात्र त्यानंतर कोरोना विषाणू चा विषय आल्याने होणाऱ्या सभेला ब्रेक लावण्यात आला त्यामुळे या कालावधीतील कित्येक महत्वाचे विषय अडकून पडले आहेत.नियमानुसार नगर परिषदेला दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे मात्र कोरोनाच्या नावाखाली ब्रेक लागलेल्या या सर्वसाधारण सभेचा मुहूर्त केव्हा काढतील याची काही निश्चिती दिसुन येत नाही .

मात्र या कालावधीत मार्च महिन्या नंतर सभा न झाल्यामुळे कित्येक महत्वाचे विषय अडकुन पडले आहेत तेव्हा कोरोनाचा विषय गांभीर्याने हाताळत पावसाळ्याचा काळ लक्षात घेऊन सर्वसाधारण सभा ह्या घेण्यात याव्या अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे


संदीप कांबळे कामठी