Published On : Tue, Sep 3rd, 2019

जनता आहारची प्रवाशांना प्रतीक्षा

Advertisement

नागपूर: गरीब आणि गरजु प्रवाशांना अगदीच कमी पैशात म्हणजे १५ रुपयात मिळणारा जनता खाना आता दिसेनासा झाला आहे. महिण्याभरापासून जनआहार हे केंद्र बंद पडल्याने १५ रुपयात मिळणारा जनता खानासाठी प्रवाशांची भटकंती सुरू आहे. कधी मिळेल जनता आहार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या हृद्यस्थानी आहे. येथून दररोज ४० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची वर्दळ असते. १२५ पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात. अशा स्थितीत गरीब आणि गरजु प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना नाममात्र दरात पोटभर जेवन मिळावे, असा उद्देश ठेवून भारतीय रेल्वेने देशभरात ही सेवा सुरू केली. यात नागपूर स्थानकाचाही समावेश आहे. फलाट क्रमांक एकवर जनआहार या नावाने हे केंद्र सुरू करण्यात आले.

ना नफा ना तोटा या तत्तवावर सुरू करण्यात आलेली सेवा गुणवत्तापुर्ण आणि रुचकर आहे. त्यामुळे जनता आहारसाठी प्रवाशांची प्रचंड मागणी असते. लांब पल्ल्याच्या प्रवासाहून आलेल्या गरजु प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरली आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावरील जनाहारचे पूवीर्पासूनच वेगळे महत्त्व राहिले आहे. पूर्वी रेल्वे प्रशासनाकडूनच जनाहारही संचालित केले जात होते. मात्र, पुढे हे आयआरसीटीच्या माध्यमातून आता खाजगी कंत्राटदारामार्फत चालविले जात होते.

आता कंत्राटच संपल्याने एक महिन्याअगोदार जनाहारला कुलूप लावण्यात आले.े. जनआहार सुरु करण्याकरिता निविदा प्रक्रिया बोलविण्यात आल्या होत्या. मात्र, ही प्रक्रियाच लांबलेली असल्यामुळे जनआहार अद्यापही सुरु झाले नाही. यामुळे गरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर स्टॉलची संख्या आधीच कमी आहे. त्यातही जनआहार बंद झाले असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे गरीब प्रवाशांकरिता जनआहार कधी असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे. जनता आहार कधी मिळेल याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.