Published On : Fri, Nov 23rd, 2018

स्त्री हा घराचा मुख्य कणा : कांचन गडकरी

आयआरसीच्या वुमेन कमिटीच्या उपक्रमांचा शुभारंभ

नागपूर: घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.आयआरसीच्या 79 व्या देशभरातून 3 हजार पाहुणे आले आहेत.

त्या पाहुण्यांच्या पत्नींना परिसरात विरंगुळा मिळावा म्हणून वुमेन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, ज्योती बावनकुळे, शारदा बडोले, मीनल येरावार, गौरी जोशी, अनघा सगणे, स्वाती किडे यांचेसह समितीचे अध्यक्ष सुचिता देबडवार, समितीचे उपाध्यक्ष अर्चना नवघरे उपस्थित होते.

यावेळी कांचन गडकरी यांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांचे उदाहरण देत उपस्थितांना प्रेरित केले. उपस्थितांच्या आग्रहावरून कांचन गडकरी यांनी यावेळी गाणेही सादर केले.

तत्पूर्वी फित कापून उद्घाटन करण्यात आले. आदिवासी गोंडी संस्कृतीच्या नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाथ ब्रेकिंग ऑफ इंडियन वुमेन या विषयांतर्गत भारतातील प्रेरणादायी महिलांवरील चित्रफित सादर करण्यात आली. कार्यक्रमाला देशभरातील महिला हजर होत्या. त्यांना हळदी कुंकू देत ओटी भरण्यात आली. आनंदी घरडे या चिमुकलीने नृत्य सादर केले.