Published On : Wed, Jun 16th, 2021

महाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप

Advertisement

जिल्ह्यात तालुक्याच्या भाजप कार्यालयात माजी पालकमंत्री आ. डॉ. परिणय फुके यांचे हस्ते ऑक्सीजन कंस्ट्रेटर मशीन वाटप..

देवरी– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन, वेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील अनेकांना जीव गमावले लागले. कोविडच्या शुरुवाती काळात महाविकास आघाड़ी सरकारने कोणतीही उपाय योजना केली नसल्यामुळे दुसऱ्या लाटेत लोकांना जीव गमवावे लागले असा घणघणाती आरोप जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार डॉ. परिणय फुके यांनी महाविकास आघाड़ी सरकार वर लावले. गोंदिया जिल्ह्यामधे सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, देवरी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव येथे विरोधी पक्ष नेंते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दिलेल्या ऑक्सिजन कन्संत्रेटर वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना फुके म्हणाले की माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोविड च्या काळात रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. आणि महाविकस आघाडी सरकारला पूर्व तयारी करण्याचा सूचना दिल्या होत्या. परंतु कोविडच्या दुसर्यार लाटेबद्दल हे सरकार अनभिज्ञ होऊन लोकानां वाऱ्यावर सोडून दिले।येणाऱ्या काळात कोविडचे संकट पुन्हा उद्रेक होण्याच्या स्वरूपात दिसत आहे, जेणेकरून भाजप हे अनेक स्तरांवर आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे काम करत आहे. माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवणारया मशीनचे वितरण करीत आहेत, जेणेकरून भविष्यात गरजू रुग्णांची सेवा करता येईल. यावेळी तालुक्यात कोरोनाने प्राण गमावलेल्या दिवंगतांना श्रधांजलि अर्पित करण्यात आली।


तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या या वितरण कार्यक्रमामध्ये माजी.मंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, भाजपा जिल्हा अध्यक्ष केशवभाऊ मानकर, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपूरे यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Advertisement

या कार्यक्रम दरम्यान बाळा भाऊ अंजंनकर , जिला संघटन मंत्री संजीव कुलकर्णी, तालुक्याचे अध्यक्ष अनिल येळणे, महामंत्री लायकराम भेंडारकर, रघुनाथ लांजेवार, नामदेवराव कापगते, उमाकांत ढेंगे, शिवनारायण पालीवाल केवलराम पुस्तोडे, प्रकाश गहाणे, रामदास कोहटकर, विजय कापगते, देवेंद्र टेंभरे, विलास बागडकर, हर्षे मोदी, चेतन वडगाये, सि.सि.येडे, अरविंद शिवणकर, गुणवंत बिसेन, काशीराम हुकरे, साहेबलाल कटरे, झामसिंग भाऊ येरणे, श्रीकृष्ण हुकरे, कौशल्याबाई कुंभरे, राजकुमार रहांगडाले, राजुभाऊ चांदेवार, छेदीलाल साहू, शंकर मडावी, बाबा लिल्हारे, बडोले सर, बद्री प्रसाद दसरिया, अॅड ऊपराडे सर, हनवंत वट्टी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.