Published On : Sat, Jun 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी आज सायंकाळपर्यंत जाहीर होणार; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Advertisement

नागपूर: राज्यात लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात भाजपने हालचाली सुरु केल्या.

आगामी विधानसभा निवडणुका पाहता सध्याच्या विधानपरिषद निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांच्या यादीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आज सायंकाळपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते, असे ते म्हणाले. यासोबतच उमेदवारांची निवड करताना त्या भागातील भौगोलिक परिस्थिती, प्रादेशिक समतोल आणि सामाजिक समीकरण लक्षात घेऊन कुशल व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी सोशल मीडियावर काल भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. मात्र ती यादी खोटी असल्याचे बावनकुळे म्हणाले. रविवारी बावनकुळे भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला जात होते. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Advertisement

बावनकुळे म्हणाले,विधानपरिषदेची यादी आज सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. आमच्या कोअर कमिटीमध्ये 18 ते 20 नावांवर चर्चा झालेली नाही, काही जण अंदाजाच्या आधारे यादी तयार करतात, मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, असेही बावनकुळे म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.