Published On : Thu, Jun 28th, 2018

कुकडी पांजरा गावातील ८ घरात पोहचली महावितरणची प्रकाश किरणे

Advertisement

नागपूर: काटोल तालुक्यातील कुकडी पांजरा या गावातील एका कोपऱ्यावर राहणाऱ्या ८ गावकऱ्यांची घरे महावितरणनी प्रकाशमान केली आहेत. कुकडी पांजरा गावातील काही गावकऱ्यांना वीज पुरवठा मिळाला नसल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना समजताच त्यांनी महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांना वीज पुरवठा देण्याचे निर्देश दिले.

प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांना सोबत घेऊन कुकडी पांजरा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व काटोलचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांना तातडीने वीज पुरवठा सुरु करण्याचे निर्देश दिले.

Advertisement

कार्यकारी अभियंता घाटोळे यांनी आपल्या सहकाऱ्याना सोबत कुकडी पांजरा गावात वीज पुरवठा सुरु करण्यासाठी कामाला सुरुवात केली. कुकडी पांजरा गावात वीज पुरवठा सुरु करण्यासाठी १ रोहित्र, ९ खांब आणि अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले .

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन गावकऱ्यांना ३ दिवसात वीज पुरवठा सुरु करून वामनराव पोहकर, बंडू पोहकर, निर्मला गेडाम, अशोक गेडाम, गजानन सावरकर, वीरेंद्र वर्मा, शरद गेडाम, शेषराव गेडाम यांच्या घरात वीजेचा प्रकाश पोहचवला . आपल्या घरात प्रकाशची किरणे पोहचवल्याबद्दल कुकडी पांजरा वासियांनी ऊर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे आभार मानले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement