Published On : Sat, Oct 10th, 2020

जांब प्रकरणाची पुनरावृत्ती होता कामा नये – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Advertisement

भंडारा : उपचारा अभावी कोविड केअर सेंटरच्या परिसरात जांब येथील तरूणाचा मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी आरोग्य विभागाने तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जागृती कार्यक्रमानंतर विधानसभा अध्यक्षांनी या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना या प्रकरणी सविस्तर माहिती सादर करावी अशा सुचना दिल्या. त्याचप्रमाणे भविष्यात अशा घटना घडता कामा नये असेही सांगितले.

जांब येथील तरूण बंडू यशवंत मरकाम हा मागिल काही दिवसांपासून आजारी होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणादरम्याण आशा स्वयंसेविका यांनी गृह भेटीत तपासणी केली असता सदर तरूणाचा एसपीओटू 35 टक्के इतका आढळला त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या ठिकाणी सुद्धा सदर व्यक्तीचा एसपीओटू कमी आढळल्याने त्यास भंडारा येथे संदर्भीत करण्यात आले. 1 ऑक्टोंबर रोजी सदर तरूणाचा मृतदेह कोविड केअर सेंटर परिसरात आढळून आला.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या तरूणाच्या कुटुंबियांची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांत्वनपर भेट घेतली असता कुटुंबियांनी आरोग्य यंत्रणेबाबत तक्रार केली. हा विषय विधानसभा अध्यक्षांनी गांभिर्याने घेवून या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. दोषी असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये, असा प्रश्नही त्यांनी आरोग्य यंत्रणेला विचारला. जिल्हयात या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement