नागपूर: दिवसे दिवस युवक व युवती व्यसनाच्या आहारी जात आहे नागपूर शहरातील तरुण व्यसनापाई गुन्हेगारी कडे वळत आहे दस्तुर खुद्द मुखमंत्री नागपूर चे आहे. त्यातल्या त्यात त्यांच्या निवासस्थानातील हद्दीत 12 हुक्का पार्लर सुरू आहे.
युवक काँग्रेसने अनेकदा ह्या बाबदत आंदोलन केले पण ह्या वर काही कारवाई झाली नाही पण हुक्का पार्लर राजरोस पने चालू आहे. नागपूर लोकसभा युवक काँग्रेसने अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात व दक्षिण व पश्चिम विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश राजन याच्या नेतृत्वात अंबाझरी पोलीस स्टेशन समोर हुक्का बंद करा.
ह्या करता आंदोलन केले तसेच अंबाझरी पोलीस स्टेशन ला युवक काँग्रेसचे कार्यकर्ता पोहचले असता वरीष्ठ पोलीस निरीक्षक हजर नाही तेव्हा युवक काँग्रेस ने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांना निवेदन दिले व त्यांना खडसाऊन सांगितले की या आगोदार निवेदन देऊन कारवाई झाली नाही हे आमचे अंतिम निवेदन आहे अन्यथा नागपूर लोकसभा युवक काँग्रेस आपल्या पदतिने आंदोलन करून प्रशासनाला सळो की पळो करू.
आजच्या आंदोलनात अखिलेश राजन, अलोक कोंडापूवार, राजेंद्र ठाकरे, श्रीवातव शर्मा, स्वपनिल ढोके, अंकित गुमगांवकर, बाबू खान, आशिष लोणारकर, अतुल मेश्राम, तुषार मदने, स्वप्नील बनसोड, निखिल कापसे, सोनू कनोजिया, रितेश भांडले, अमन तेमबुलने, शुभम दिगळे, आदी उपस्थित होते.