Published On : Wed, Jun 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

शिंदे गटावर अपात्रतेची टांगती तलवार , उद्धव ठाकरेंकडे पुन्हा शिवसेना जाणार ; जितेंद्र आव्हाडांचा नागपुरात दावा

Advertisement

नागपूर : राजकीय सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नागपुरात आपले मत मांडत मोठा दावा केला. राज्यात शिंदे आणि ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला . त्यावरून शिंदे सेनेचे आमदार अपात्र ठरणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण परत मिळणार आहे, असा दावा आव्हाड यांनी केला.

‘चला या सर्वच्च न्यालायचा निकाल समजून घेऊ या..‘ या कार्यक्रमांर्गत जितेंद्र आव्हाड यांनी नागपुरातील देशपांडे सभागृहात जाहीर कार्यक्रम घेऊन न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य केले. न्यायालयाने विविध पाच याचिकेवर १४१ पानांमध्ये आपला निकाल दिला आहे. याचा परिणाम देशावर दीर्घकालीन पडणार असून राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निकाल देताना १४१ पानांची चौकट बांधून दिली आहे.त्याबाहेर त्यांना पडताच येणार नाही. त्यामुळे आमदारांना त्यांना अपात्र ठरवावेच लागणार,असेही आव्हाड म्हणाले. व्हीप बदलण्याचा अधिकार पक्ष प्रमुखांना असतो. ज्यावेळी शिंदे सेनेचे व्हीप बदलला तेव्हा त्यांचा पक्ष अस्तित्वाच नव्हता. आमदार म्हणजे पक्ष होत नाही. आमदारांच्या संख्येवर पक्ष ठरत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धाबे दणाणले आहे. संपूर्ण न्यायाप्रणाली आपल्याच हाती आहे अशी भावना काही लोकांची झाली होती. त्यानुसार आमदारांना विकत घेतले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सर्वांचे गर्वहरण केले, असा घणाघात आव्हाड यांनी केला. शिंदे गटाने सर्व वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीवरही आव्हाड यांनी भाष्य केले. आज विविध वर्तमानपत्रांमधील जाहिराती बघून देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा हे सरकार पडावे असे आता वाटत असेल. त्यांच्या चेहऱ्यावर तसे दिसत असल्याचेही आव्हाड म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.