Published On : Sun, Mar 22nd, 2020

शासनाच्या लॉकऑउट आदेशाला दाखविली हल्दीराम प्रशासनाने कचऱ्याची टोपली

कामठी :-संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस आता देशात व महाराष्ट्रात सुध्दा वाढत आहे असे असतांना कोरोनाच्या होणाऱ्या प्रसारास आळा घालण्यास्तव व *कोरोना*पासून बचाव करण्यासाठी शासनाने लॉकऑउटचे आदेश दिलेले आहे.

व या आदेशाचे सर्वत्र स्वागतही केले जात आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व लहान मोठे रेस्टॉरंट व लहान मोठी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र मौजा गुमथळा येथील *हल्दीराम*चे सर्व युनिट सर्रास सुरु असून ३००० हून अधिक कामगार कामावर आहेत.यानुसार शासनाच्या लॉकआऊट आदेशाला हल्दीराम प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.

ही माहितो मिळताच जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे, कामठी पंचायत समितीचे उपसभापती आशिष मल्लेवार, कामठी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ढोले, राजेश वाघ, ग्रामपंचायत केमचे उपसरपंच अतुल बाळबुधे व प्रहारचे कामठी तालुका अध्यक्ष छत्रपाल करडभाजने यांनी कंपनीत भेट दिली असता हल्दीराम व्यवस्थापनाची मनमानी समोर आली.