| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 12th, 2018

  राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचेकडून राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह अनेक मान्यवरांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे ७६ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी देखील पत्र पाठवून राज्यपालांचे अभिनंदन केले.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेउन राज्यपालांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

  केरळचे राज्यपाल के सथशिवन, छत्तीसगडचे राज्यपाल बलरामदास टंडन, उत्तराखंडचे राज्यपाल के के पॉल, बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अशोक हिंदुजा, जयराज साळगावकर आदी मान्यवरांनी राज्यपालांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145