Published On : Wed, May 6th, 2020

शासनाने अन्यत्र अडकलेल्या विद्यार्थी, मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवावे : बावनकुळे

Advertisement

राज्य शासनाकडे दुसर्‍यांदा पाठपुरावा

नागपूर, 6 मे कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून सुरु झालेल्या संचारबंदीमुळे विदर्भातील तसेच अन्य जिल्ह्यातील अनेक जण बाहेर अडकून पडले आहे. त्यात विद्यार्थी, कामगार, मजूर, नोकरदार असे अनेक जण आहेत. या सर्वांना राज्य शासनाने त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पुन्हा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाला केली आहे.

यापूर्वीही या मागणीचे एक पत्र बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले होते. विविध जिल्ह्यातील हजारो कामगार, मजूर, विद्यार्थी आपल्या घराबाहेर अडकून पडले आहेत. त्यांना गेल्या दीड महिन्यापासून घरी येता येत नाही. परवानगीही मिळत नाही. अशा विद्यार्थी-कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी शासनाची आाहे. हजारोंच्या संख्येत हे लोक अडकून पडले आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे व परवानगी मिळत नसल्यामुळे या कामगार, मजुरांची प्रचंड अडचण झाली आहे, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

ज्या प्रमाणे केंद्र शासनाने अशा लोकांना घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे सेवा सुरु केली आहे. त्यामुळे या राज्यातून त्या राज्यात लोकांना पोचविले जाते आहे.

राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस किंवा खाजगी बसेसच्या माध्यमातून सोशल डिस्टसिंगचा व अन्य नियम पाळून या लोकांना आपापल्या घरी पोहोचवावे. ही शासनाची जबाबदारी आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजीही शासनाने घेऊन हे लोक घरी पोहोचेपर्यंत त्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.