
नागपूर : महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत परिसर दणाणून सोडला. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली रक्कम ही अक्षरश: तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे,अशी टीका करत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.
राज्यातील शेतकरी संकटात आहे. सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र ही नुकसानभरपाई तोकडी असल्याचे विरोधकांनी म्हटले.
महाराष्ट्र शिव- शाहू- फुले- आंबेडकरांचा की दहशतखोरांचा’, ‘इक्बाल मिर्चीसोबत कुणाचे व्यवहार’, कोणता मंत्री ड्रग्ज माफियाचा साथीदार’, ‘महिला असुरक्षित तरुण बेरोजगार, झोपा काढतंय हे ट्रिपल इंजिन सरकार’,अशा आशयाचे लिहिलेले पोस्टर घेऊन विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.
दरम्याम आंदोलनात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, रवींद्र वायकर, रवींद्र धंगेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दादेखील उपस्थित करण्यात आला.
नागपुर में अवैध साहुकारी का खेल बेनकाब,
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 6 JULY 2026 #newsupdate...
मिसिंग लिंक की बदहाली पर तीखा हमला #maharashtranews #newsupdate #politicsnews #latestnews
आमगांव में घरों में घुसा बारिश का पानी #maharashtranews #barish #mansoon #nuksan
सीबीजी गैस पर वाहन चालकों का विरोध #maharashtranews #andolan #cnggas #wardhanews #newsupdate




