Published On : Thu, Jul 15th, 2021

डोक्यावरील सोनेरी केस पडले महागात

केवळ सहा तासात गुन्ह्याचा छडा

नागपूर: सध्या डोक्यावरील केसांना रंगविने अन् कानात डूल घालण्याची फॅशन आहे. त्यानेही केसाला सोनेरी रंग लावला. आगळी वेगळी फॅशनच त्याच्यासाठी महागात पडली. आरोपी संदर्भात कुठलाच धागा नसताना पोलिसांनी कौशल्याचा वापर करीत सोनेरी केस अन् कानात डूल घातलेल्या युवकाचा ठिकठिकाणी शोध घेतला अन् अवघ्या सहा तासात या चोरीचा छडा लावला.

राहूल हाटेवार (२५), रा. गुप्तानगर, नरेन्द्र ऊर्फ बाली बोकडे (२०), रा. राम मंदीर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघेही पोलिस अभिलेखावर आहेत.

मीणी माता नगर निवासी ईश्वर कोठारी (२७) हा पेंटिगचे काम करतो. कामानिमीत्त तो बाहेरगावी गेला होता. बुधवारी सकाळी शिवनाथ एक्सप्रेसने इतवारी रेल्वे स्थानकावर आला. गाडीतून उतरल्यानंतर दोन युवक त्यांच्या जवळ गेले. ऑटोरिक्षा पाहिजे काय? अशी विचारणा केली. मीणी माता नगरात जायचे आहे असे ईश्वर म्हणाला. त्यावर दोघांनीही ४० रूपयात सवारी नेण्याचे म्हटले. अन्य ऑटोचालक याच ठिकाणचे १०० रूपये घेतात. मात्र, या रिक्षाचालकांनी केवळ ४० रूपये सांगितले. त्यामुळे ईश्वरही पट्कन तयार झाला. रिक्षा बाहेर ठेवला आहे, तिकडेच चला असे म्हणत त्यांनी ईश्वरला बाहेरच्या दिशेने घेवून गेले. इतवारी रेल्वे स्थानकासमोरील पुलाखाली नेवून त्याला मारहाण केली. चाकूच्या धाकावर त्याच्या जवळील १२ हजार ५०० रूपये qकमतीचा मोबाईल हिसकावून दोघेही पसार झाले.

तत्पूर्वी आम्ही शहराचे डॉन आहोत, पोलिसांना सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर ईश्वर जीव मुठीत घेवून घरी परतला अन् काही न सांगता शांत बसला. घरी आलेल्या मित्रांना त्याने घडलेला प्रकार सांगितला. मित्रांच्या सल्ल्यावरून तो घाबरत पोलिस ठाण्यात गेला. सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख यांना सारा प्रकार सांगितला. शेख यांनी ईश्वरला दिलासा दिला. अवघ्या सहा तासाला आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

असा घेतला शोध
लुटपाट करणाèया पैकी एकाने डोक्याच्या केसाला सोनेरी रंग लावला अन् कानात डूल घातले, एवढीच ओळख ईश्वने पोलिसांना सांगितली. यावरून पोलिस उपनिरीक्षक वरठे, पोलिस हवालदार विजय सुरडे, नन्नावरे, अवतारे, सहारे यांनी ऑटोचालकांची विचारपूस केली. कुंदनलाल गुप्ता नगरात अशा प्रकारचा युवक असल्याच्या माहितीवरून शोध घेतला असता आरोपी घरीच मिळाला.