Published On : Fri, Jul 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आईने रागावल्यामुळे तरुणीने घेतला गळफास !

Advertisement

नागपूर : आईने झोपेतून लवकर उठण्यासाठी रागावल्यामुळे मुलीने तिच्या अमर नगरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रीती अशोकराव हर्षे (२८) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून प्रीती आईला घरकामात मदत करीत नव्हती. तसेच ती सकाळी उशिरापर्यंत झोपत होती. त्यामुळे तिची आई वारंवार ओरडत होती. गुरुवारी सकाळी प्रीती १० वाजले तरीही झोपेतून उठली नव्हती. त्यामुळे तिच्या आईने तिला रागावले.

आई ओरडल्यामुळे प्रितीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.