Published On : Fri, Nov 17th, 2017

नासुप्र विश्वस्त मंडळाची सर्वसाधारण सभा आज नासुप्र येथे संपन्न

Advertisement

NIT Nagpur
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या आज विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास कार्यांना नासुप्रच्या विश्वस्त मंडळानी मंजुरी प्रदान केली.बैठकीमध्ये नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्दगल, नासुप्रचे विश्वस्त व स्थायी समिती अध्यक्ष, मनपा, संदीप जाधव, विश्वस्त भूषण शिंगणे उपस्थित होते.

१.) नागपूर शहरात नागपूर सुधार प्रन्यासच्या वाटपास उपलब्ध असलेल्या सार्वजनिक तसेच मालकीच्या जागेपैकी पशुपालन विभागास सोयीस्कर असलेल्या जागेची यांदी त्यांच्या तर्फे प्राप्त झाल्यानंतर मिल्क बुथ लावण्याकरीता पशुपालन, डेअरी व मत्स्यपालन विभाग, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांना वार्षिक भाडेपट्ट्यावर देण्यास्त्व मंजुरी प्रदान करण्यात आली. या संदर्भातचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, शासनाकडून संबंधित प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतर ही जागा पशुपालन विभागास हस्तांतरीत करण्यात येईल.

सबब प्रकरण लक्षात घेता या जागांवर मिल्क बुथ लावण्याकरीता ३० वर्षाच्या कालावधीकरीता नाममात्र रु.१/- प्रती जागा याप्रमाणे वार्षिक दराने भाडेपट्ट्यावर शर्ती व अटीवर विशेष बाब म्हणून नासुप्र जमीन विनियोग नियम १९८३ मधील नियम क्र.२१ ला नियम क्र. २६ अंतर्गत शिथिल करून शासनाची पूर्व मान्यता घेवून परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. शासनाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त जागेबाबत नागपूर सुधार प्रन्यास,पशुपालन,डेअरी व मत्स्यपालन विभाग, (महाराष्ट्र शासन) व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्यामध्ये त्रिपक्षीय MoU(Memorandum of Understanding) केल्यानंतर या जागेचा ताबा हस्तांतरित केल्या जाईल तसेच,सबब जागा वाटपाचे सर्व अधिकार नासुप्र सभापती यांना देण्यात आले आहे, या प्रकारचा निर्णय आज विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

२.) परवडणारी घरे (Affordable Housing) प्रकल्प राबविन्याकरीता मौजा. भरतवाडा-पुनापूर तसेच मौजा. वांजरी व जयताळा या जागांच्या उपयोगात शासनाद्वारे मंजूर झालेल्या विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम-३७ अन्वये फेरबदल करण्याबत विश्वस्त मंडळानी आज मंजुरी दिली.

वर दर्शविल्याप्रमाणे मौजा. वांजरी व जयताळा या जागेचे “नियोजन प्राधिकरण” नागपूर महानगरपालिका असल्याने या जागेच्या उपयोग फेरबदलाची कार्यवाही म.न.पा द्वारे करण्यात येईल, तसेच मौजा.भारतवाडा-पुनापूर ही जागा नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्राअंतर्गत समाविष्ट असल्याने या जागेबाबत “नियोजन प्राधिकरण म्हणून रहिवासी उपयोग करण्याची कार्यवाही MRTP Act – १९६६(Under section 37) अंतर्गत नासुप्रद्वारे करण्यात येईल. सध्यास्थितीत या ठिकाणी १११ विटा भट्टी धारकांना पूर्वी देण्यात आलेले परवाने रद्द करण्यात आले असून त्यासंदर्भात त्यांना नासुप्र तर्फे पत्र पाठविण्यात आले आहे.संबंधित जागेचे आरक्षण वगळून “निवासी” उपयोगाकरिता समाविष्ट करण्याकरिता फेरबदलाच्या प्रस्तावास आज विश्वस्त मंडळांनी मान्यता दिली, यानंतर संबधित प्रस्ताव शासनाच्या मंजुरी करीता सादर करण्यात येईल.