मुंबई :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या पदरी निराशा आल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
यावर आता उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. देशाचा अर्थसंकल्प देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे.
अनेक प्रगत देश अर्थव्यवस्थेची झुंजत आहेत. अशा परिस्थितीत भारताने 8.2 टक्याची वाढ दाखवली आहे. ही वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करुन देणारी वाढ आहे.
राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांनाबरोबर घेऊन जुन्या पेन्शनसारखे काही नियम केले. त्याच धर्तीवर आता केंद्र सरकार देखील पुढे नेण्याच काम करत आहे. या अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस न पाडता भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली.
image.png