Published On : Sat, Aug 13th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वातंत्र्याच्या रोषणाईने उजळले संपूर्ण नागपूर शहर

Advertisement

– दोन तिरंगा पथ, ७५ चौक, हुतात्मा स्मारक स्थळीही रोषणाई : तीन महत्वाच्या ठिकाणी लाईट शो

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षपूर्ती अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता संपूर्ण नागपूर शहर सज्ज झाले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरामध्ये तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील ७५ चौक, हुतात्मा स्मारक, पुतळे येथील रोषणाईसह शहरातील दोन रस्ते तिरंगा पथ म्हणून सजले आहेत. याशिवाय कविवर्य सुरेश भट सभागृह, यशवंत स्टेडियम आणि चिटणीस पार्क येथे विशेष रोषणाई करण्यात आली असून येथे तिरंगी लाईट शो ची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण नागपूर शहर अमृत महोत्सवीय स्वातंत्र्यदिनाच्या स्वागतासाठी उजळून निघाले आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संपूर्ण नागपूर शहरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर व्हावा, देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी, मनपा मुख्यालयातील इमारती, नगर भवन, झोन कार्यालय यासह शहरातील शहिद स्मारक, महत्वाचे चौक, कविवर्य सुरेश भट सभागृह, रा. पै. समर्थ चिटणीस पार्क स्टेडियम आणि यशवंत स्टेडियमसह दोन विशेष मार्गांवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतही तिरंगी रंगात सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील सर्व शहिद स्मारक, विविध ठिकाणी असलेले पुतळे यांची मनपाद्वारे स्वच्छता करण्यात आली त्याचे सुशोभीकरण करण्यात आले. या ठिकाणी सुद्धा रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौकांचे विविध देशभक्ती थीमवर आधारित सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहरातील अनेक चौकांना स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आहे. शहरातील ७५ महत्वाचे व ऐतिहासिक चौकांमध्ये आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली. यासाठी चौक, स्मारकांची स्वच्छता, रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता करून, पुढील तीन दिवस स्थानिक नागरिकांच्या सहभागाने त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दोन तिरंगा पथ
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील दोन महत्वाच्या मार्गांवरील विद्युत खांबांवर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून हे मार्ग तिरंगा पथ म्हणून सजले आहेत. सिव्हिल लाईन्स येथील संविधान चौक ते लेडीज क्लब चौक आणि शंकर नगर ते जापानी उद्यान चौक या दोन मार्गावरील विद्युत खांब तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहेत. याशिवाय शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृह, रा. पै. समर्थ चिटणीस पार्क स्टेडियम आणि यशवंत स्टेडियमवरही सुशोभिकरण आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात आहे.

विद्युत रोषणाईने उजळून निघाले ७५ चौक
मनपातर्फे शहरातील महत्वाच्या ७५ चौकांवर तिरंगी रोषणाई करण्यात आलेली आहे. या चौकांची माहिती पुढील प्रमाणे :

लक्ष्मीनगर झोन (झोन कार्यालयासह) : हॉटेल प्राईड चौक, राजीव गांधी चौक, दीक्षाभूमी चौक, बजाज नगर चौक, व्ही.एन.आय.टी. चौक, अजनी सबस्टेशन चौक, आठ रस्ता चौक.

धरमपेठ झोन (झोन कार्यालयासह) : रामनगर चौक, लक्ष्मीभवन चौक, शंकरनगर चौक, विधानभवन चौक, आकाशवाणी चौक, सदर गांधी पुतळा, विद्यापीठ चौक, झाशी राणी चौक, संविधान चौक, डॉ. आंबेडकर पुतळा, गांधी पुतळा व्हेरायची चौक, झिरो माईल्स, गोवारी स्मारक.

हनुमान नगर झोन (झोन कार्यालयासह) : तुकडोजी चौक, क्रीडा चौक, जुनी शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा, मेडीकल चौक.

धंतोली झोन (झोन कार्यालयासह) : सरदार पटेल चौक, शहिद स्मारक कॉटन मार्केट चौक, हुतात्मा स्मारक गांधीसागर तलाव, सावित्रीबाई फुले पुतळा, कॉटन मार्केट, डॉ. आंबेडकर पुतळा जाटतरोडी चौक, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा कॉटन मार्केट, सावित्रीबाई फुले पुतळा गांधीसागर, सानेगुरुजी पुतळा गांधीसागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्रिशरण चौक, कुंदनलाल गुप्ता पुतळा इंदिरानगर, तुळशीरामजी भुरे पुतळा कॉटन मार्केट, गांधीसागर टि-पॉईंट

नेहरुनगर झोन (झोन कार्यालयासह) : राजे रघुजी भोसले सक्करदरा चौक, चिमाजी भोसले छोटा ताजबाग चौक, महात्मा बसवेश्वर पुतळा, संत जगनाडे महाराज चौक नंदनवन.

गांधीबाग महाल झोन (झोन कार्यालयासह) : नगर भवन, गांधी गेट, छत्रपती शिवाजी पुतळा महाल, टिलक पुतळा, बडकस चौक, चिटणीस पार्क चौक (रुईकर पुतळा), चंद्रशेखर आझाद चौक (पुतळा) सी.ए. रोड, टेलिफोन एक्सचेंज चौक (डॉ. राजेंद्र प्रसाद पुतळा), गांधीपुतळा चौक (सी.ए. रोड), अग्रसेन चौक, गोळीबार चौक, शहिद काकडे पुतळा (मेयो हॉस्पीटल चौक), झेंडा चौक महाल, शहिद चौक, महाल चौक, टाऊन हॉल चौक, मोरभाऊ अभ्यंकर पुतळा, पुनमचंद राका पुतळा, गांधीपुतळा, संतरजीपुरा, भगत कवलराम पुतळा सी.ए. रोड, आर. जी. कुंभारे पुतळा गांधीबाग गार्डन, दोसर भवन चौक, इतवारी पोस्ट ऑफीस जवळ, संत तुकडोजी महाराज पुतळा, आगारामदेवी चौक.

संतरजीपुरा झोन (झोन कार्यालयासह) : सुभाष पुतळा, सतरंजीपुरा, नेहरु पुतळा अनाज ओळी, भारतमाता चौक जागनाथ बुधवारी, इंदिरा गांधी पुतळा मुदलीयार चौक, राणी दुर्गावती पुतळा राणी दुर्गावती चौक, बिरसामुंडा पुतळा दुर्गावती चौक, शिवाजी पुतळा प्रेमनगर.

लकडगंज झोन (झोन कार्यालयासह) : डॉ. आंबेडकर पुतळा.

आशीनगर झोन (झोन कार्यालयासह) : बॅ. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा, कर्मविर आवळेबाबू पुतळा, कमाल चौक.

मंगळवारी झोन (झोन कार्यालयासह) : मेश्राम पुतळा सदर, एन.आय.टी. टि-पॉईंट श्री.साधु.

Advertisement
Advertisement