नागपूर: महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ४ एप्रिल रोजी बर्डी, धंतोलीसह काँग्रेस नगर विभागात वीज पुरवठा खालील वेळेत बंद राहणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते १० या वेळेत झाशी राणी चौक, संगम चाळ, जानकी टॉकीज, तेलीपुरा, हनुमान गल्ली, अभ्यंकर रोड, विजयानंद सोसायटी, अमरज्योती पॅलेस , यशवंत स्टेडियम परिसर, वर्धा रोडवरील नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, गजानन नगर, उरुवेला कॉलनी , समर्थ नगर,छत्रपती नगर, प्रशांत नगर, जेल परिसर, अजनी चौक, चुना भट्टी, हिंदुस्थान कॉलनी, राजीव नगर, माटे चौक परिसर, त्रिमूर्ती नगर,आठ रस्ता चौक, खामला, आदिवासी सोसायटी, अग्ने ले आऊट, त्रिशरण नगर, उज्वल नगर, कन्नमवार नगर, कर्वे नगर.
तसेच सकाळी ८ ते १० या वेळेत अमरावती मार्गावरील हिंदुस्थान कॉलनी, मरार टोळी, तेलंखेडी, गोंड वस्ती, राम नगर, शंकरनगर, हिल रोड, शिवाजी नगर सिमेंट रोड, भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर,मनीष ले आऊट या परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे.
