नागपूर: उत्तर नागपूरमधून नितीन राऊत यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून धर्मपाल मेश्राम यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरावरून करण्यात येत आहे. नागपूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे नितीन राऊत यांच्याविरुद्ध भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. या मतदारसंघातून धर्मपाल मेश्राम यांना भाजप उमेदवारी जाहीर करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मेश्राम यांच्या सोबतच माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.
आंबेडकरी चळवळीतील प्रबळ नेता म्हणून धर्मापल मेश्राम यांची ओळख –
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरू केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळी पुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हणतात. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या विचारांना अनुसरून धर्मपाल मेश्राम समजासाठी काम करीत असल्याच्या भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत.त्यामुळे भाजपाने त्यांना न्याय देऊन त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याची मागणी त्यांनी समर्थकांनी केली आहे.
उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला- उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर कॉंग्रेस, भाजप आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही सत्ता मिळवली आहे. त्यामुळे भाजपने आंबेडकरी चळवळीच्या नेता असलेले धर्मपाल मेश्राम यांनी जर उमेदवारी दिली तर ते या मतदारसंघातून निवडून येऊ शकतात, अशा भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. नितीन राऊत यांच्या कार्यप्रणालीवर जनता नाराज- उपराजधानी नागपुरातील उत्तर नागपूर मतदारसंघ हा झोपडपट्ट्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसने डॉ. नितीन राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र आमदार असतांनाही नितीन राऊत यांनी या मतदारसंघात विकास केला नसल्याची ओरड जनतेत आहे.
मिलिंद मानेही जनतेचे प्रश्न सोडविण्यात ठरले अपयशी –
गेल्या २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत डॉ. मिलिंद माने यांनी निती राऊत यांचा पराभव केला. परत २०१९ मध्ये नितीन राऊत विजयी झाले. मात्र मिलिंद माने आमदार असताना येथील स्थानिक जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. मिलिंद माने प्रमाणे नागपूर महानगर पालिकेत भाजपच्या सत्ताकाळात विविध पदावर असलेले संदीप जाधव यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.