Published On : Sat, Mar 28th, 2020

आयुक्तांनीच कलम 144 व संचारबंदी याचा भंग केलेला आहे

शिक्षक संघ नेता गवरे यांचा संगीन आरोप


नागपूर– महानगरपालिकेत एकूण दहा झोन असून प्रत्येक जण अंतर्गत शिक्षकांचा सभा घेणे अपेक्षित होते परंतु एकाच ठिकाणी लक्ष्मीनगर झोन येथे पाचशे ते सहाशे शिक्षकांना एकत्रित बोलून नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच कलम 144 व संचारबंदी याचा भंग केलेला आहे एकाच ठिकाणी सर्व गर्दी झाल्याने एखादी शिक्षक बाधित झाला यास जबाबदार कोण राहिल शिक्षकांना कोणतीच पूर्वसूचना न देता इथे आल्यावर

सर्वे ला पाठवणे कितपत योग्य याबाबत याबाबतीत माननीय सहाय्यक आयुक्त राजीव भिवगडे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांना लेखी आदेशाची मागणी करण्यात आली उद्या सेवेत असताना एखाद्याच बाधा झाली तर जबाबदार कोण हा प्रश्न करण्यात आला


त्यावेळेस त्यांनी तुमचे शिक्षणाधिकारी तुम्हाला लेखी आदेश देतील असे सांगितले त्यानंतर महापौर यांना दूरध्वनीवरून फोन करून येथे बोलवण्यात आलं मग त्यांच्या समक्ष सभा झाली त्यामध्ये त्यांनी दिलेले निर्देश या व्हिडिओ क्लिप मध्ये आहे।