Published On : Tue, Apr 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

आयुक्तांनी केली नाग नदीच्या स्वच्छता कामाची प्रत्यक्ष पाहणी

पावसाळ्यापूर्वी नाग नदीची स्वच्छता करण्याचे आयुक्तांचे निर्देश
Advertisement

नागपूर: शहरातील नदी नाले यांची पावसाळ्यापूर्वी करावयाची स्वच्छता लक्षात घेता, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता.21) नाग नदीच्या स्वच्छता कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी नगरसेवक श्री. विनय दाणी, श्री. विजय ढोले, श्री. योगेश पाचपौर, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, धरमपेठ झोनचे कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, धंतोली झोनचे कार्यकारी अभियंता श्री. अनिल गेडाम, उपअभियंता श्री. पुंडलिक ढोरे, धरमपेठ झोनचे झोनल स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश बासनवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्वप्रथम अंबाझरी येथील क्रेझी कॅसलमधून जाणाऱ्या नदी पात्राची पाहणी केली. त्यानंतर व्हीएनआयटी,, सरस्वती माध्यमिक शाळा, रातुम नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, यशवंत स्टेडियम संगम पॉईंट, गवळीपुरा आणि मॉरिस कॉलेज मैदान व इतर ठिकाणांची पाहणी केली.


पाहणी दरम्यान मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नदीचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच पावसाळ्यापूर्वीच नाग नदी मधील गाळ आणि जलपर्णी काढण्याकरिता प्लास्टिक फिशर वापरून अडवता येईल का याची शक्यता तपासावी व नाल्यात मशिनरी उतरण्यासाठी रॅम्प तयार करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement

शहरात ज्या नाल्यांमध्ये मशिनच्या साहाय्याने सफाई करणे शक्य नाही, त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून सफाई पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तदनंतर त्यांनी मनपाच्या बैद्यनाथ चौक येथे असलेल्या कारखाना विभागाला भेट दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.