नागपूर : शहरातील एचबी टाऊन मेट्रो रेल्वे पुलाखालील रस्त्याची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
एचबी टाऊन मेट्रो रेल्वे पुलाखालील रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला असून, या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला.कारण दिवसेंदिवस याठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून अधिकारी झोपेत असल्याचे दिसते. सुदर्शन मिश्रा यांनी नमूद केल्यानुसार मेट्रो रेल्वेचे अधिकारी आणि कंत्राटदारांनी रस्ते बांधकामात मोठा भष्ट्राचार केला.
मेट्रो रेल्वेचे निष्काळजी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्याबद्दल सुदर्शन मिश्रा यांनी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्यावर उघड टीका केली आहे.
या ठिकाणी निर्माण झालेल्या गोंधळासाठी गडकरींनी कठोर पावले उचलावीत आणि जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांना तात्काळ बडतर्फ करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





