
बीड : श्री क्षेत्र नारायण गडावरील संत कुलभूषण नगद नारायण यांच्या समाधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन गडाची पाहणी केली. तसेच श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानाच्या विविध विकास कामांसाठी मंजूर केलेल्या २५ कोटी निधीअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामांमध्ये मंदीर परिसरात दगडी फरशी बांधकाम, पाण्याची टाकी, पाईप लाईन व उपांग दुरुस्तींची कामे, सिमेंट काँक्रिट वाहनतळ, बस स्टॅण्ड, भक्तनिवास, सांस्कृतिक सभागृह, दोन प्रसादालय, दर्शनाची व्यवस्था, पालीस मदत केंद्र, डिजिटल लॉकर आदी विविध कामांचा समावेश आहे.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज, आमदार सर्वश्री विनायक मेटे, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आदी उपस्थित होते.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





