Published On : Sat, May 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या आंबेडकर कॉलेजची चमक; बारावीत अदिती शिंदे 96% गुणांसह कॉमर्समध्ये अव्वल!

सायन्स शाखेत प्रियांश देशमुख याला सर्वाधिक 93.5% गुण तर आर्ट्स शाखेत आदित्य मंगलला 83% टक्के गुण !
Advertisement

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर होताच शहरातील आंबेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली छाप उमटवली आहे.

सायन्स शाखेत प्रियांश देशमुख याने 93.5% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. कॉमर्स शाखेत अदिती शिंदे हिने तब्बल 96% गुणांसह आघाडी घेतली, तर आर्ट्स शाखेत आदित्य मंगल याने 83% गुण मिळवत आपल्या शेतकरी कुटुंबाचा अभिमान वाढवला.

या तिघांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास महत्त्वाचा ठरला. विशेष म्हणजे, आदित्य मंगल याने ग्रामीण पार्श्वभूमीतून येत अनेक अडचणींवर मात करत हे यश मिळवले, ज्यामुळे त्याची कामगिरी अधिक प्रेरणादायी ठरते.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आंबेडकर कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण असून, शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. कष्ट, जिद्द आणि मोठी स्वप्ने बाळगण्याची तयारी असेल, तर यश नक्कीच मिळते, हे या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.