Published On : Mon, Jun 24th, 2019

कामठी नगर परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विरोधी गटाचा बहिष्कार

नगर परिषद उपाध्यक्षपदी नगरसेविका शाहिदा बेगम अन्सारी विजयी

कामठी:-कामठी नगर परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक कामठी नगर परिषद सभागृहात आज 24 जून ला दुपारी 2 वाजता पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आली. निवडणूक कार्यक्रमानुसार सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करायच्या मुदत वेळेपर्यंत कांग्रेस चे प्रभाग क्र 7 च्या नगरसेविका शाहिदा बेगम अखतर अन्सारी या एकमेव उमेदवारानेच नामनिर्देशन पत्रे सादर केले ज्यामध्ये सूचक अन्सारी सुरेय्या बेगम मोहम्मद नसीर तर अनुमोदक नगरसेविका मोहसिनूर रहमान साफिया कौसर हे होते तसेच उमेदवार शाहिदा बेगम अखतर अन्सारी यांच्या विरोधात कुणाचाही नामनिर्देशन पत्र सादर न झाल्यामुळे उपाध्यक्षपदी नगरसेविका शाहिदा बेगम अखतर अन्सारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या निवडणुकीत एकूण 32 नगरसेवक तसेच 3 नामनिर्देशीत सदस्यांपैकी फक्त 23 सदस्यांनी उपस्थिती दर्शविली. ज्यामध्ये विरोधी गटातील भाजप -बरीएम चे नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शवून जणू काही बहिष्कार दर्शविला मात्र शिवसेनेचे नगरसेवक राजू पोलकंमवार व नामनिर्देशित नगरसेवक भाजप चे सुभाष मंगतानी यांनी उपस्थिती दर्शवून बहिष्कार दर्शविलेल्या विरोधी गटाला असमर्थीत ठरले.

9 जानेवारी 2017 ला जाहीर झालेल्या कामठी नगर परिषद निवडणूक निकालानुसार नगराध्यक्षपदी कांग्रेस चे उमेदवार मो शाहजहा शफाअत निवडून आले होते तर 16 प्रभाग मिळून 32 निर्वाचित नगरसेवक निवडून आले होते ज्यामध्ये कांग्रेस चे 16, भाजप चे 8, बरीएम चे 2, अपक्ष 3, एमआयएम 1, बसपा 1, शिवसेना च्या 1 नगरसेवकांचा समावेश आहे.पूर्व उपाध्यक्ष अब्दुल मतीन खान यांचा उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ 18 मार्च 2019 ला च संपला होता मात्र मद्यांतरी आलेल्या काही तांत्रिक अडचणी अभावी दरवर्षी होणारी ही उपाध्यक्ष पदाची निवडणूक तीन महिने लांबली मात्र आज झालेल्या या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगरसेविका शाहिदा बेगम अखतर अन्सारी बिनविरोध निवडून आले.या निवडणुकीत नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, माजी उपाध्यक्ष अब्दुल मतीन खान, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, नीरज लोणारे, अपक्ष नगरसेवक रघुवीर मेश्राम, बसपा चे रमा नागसेन गजभिये, नांमनिर्देशित सदस्य सुभाष मंगतानी, कांग्रेस चे नामनिर्देशित सदस्य रमेश दुबे यासह 23 सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.तर याप्रसंगी मावळते उपाध्यक्ष अब्दुल मतीन खान यांनी विद्यमान उपाध्यक्ष शाहिदा बेगम अन्सारी यांना शुभेच्छा देत पदभार सोपविला.

उपाध्यक्ष पदी पाच सदस्यांना संधी देण्यात येणार असल्याच्या नगराध्यक्षाच्या वचनपूर्तीला नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत कायम असून उपाध्यक्षपदासाठी पाच सदस्यांची नावे निवडन्यात आले होते ज्यामध्ये काशीनाथ प्रधान, अब्दुल मतीन खान, अहफाज अहमद, शाहिदा बेगम अन्सारी, वैशाली मानवटकर, यांचा समावेश होता. या पाचही सदस्यांचे ईश्वरचिठी नुसार उपाध्यक्ष पदी नियोजित पद्धतीने वर्णी लागणार असल्याचे बजावण्यात आले यानुसार पहिल्या वर्षी 2017 मध्ये उपाध्यक्ष पदासाठी काशीनाथ प्रधान, 2018 मध्ये अब्दुल मतीन खान 2019मध्ये शाहिदा बेगम अन्सारी यांच्या नावाची वर्णी लागली तर पुढील दोन वर्षासाठी आता नगरसेविका वैशाली मानवटकर, अहफाज अहमद यांचे नावे प्रतिक्षेत आहेत.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement