Published On : Thu, Aug 18th, 2022

भाजयुमो विद्यार्थी आघाडीने विद्यापीठाच्या वाढीव फी संदर्भात दिले प्र-कुलगुरूंना निवेदन..!

Advertisement

भारतीय जनता युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी, नागपूर महानगरातर्फे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु संजय दुधे यांना विद्यापीठातर्फे वाढीव फी संदर्भात निवेदन देण्यात आले.

विद्यापीठाद्वारे परत एकदा प्रचंड फी वाढविण्यात आले आहे. या संकटकाळात विद्यार्थी व पालकांना अधिक सुविधा व मदत देण्याऐवजी २०% एवढी प्रचंड शुल्कवाढ करणे असंवेदनशील व आश्चर्यकारक आहे. यासोबतच पूढील वर्षी होणारी ७% शुल्कवाढ देखील आताच घोषित करण्यामागे विद्यापीठाचा हेतू समजण्यापलिकडचा आहे. या विषयावर भा.ज.यु.मो. विद्यार्थी आघाडी तर्फे आज विद्यापीठाचे प्र-कुलगुरु संजय दुधे निवेदन देण्यात आले व त्वरित ही शुल्कवाढ रद्द करण्यात यावी असा इशारा देखील देण्यात आला. जर विद्यापीठाने ही शुल्कवाढ कमी केली नाही तर भविष्यात भा.ज.यु.मो. विद्यार्थी आघाडी, नागपूर शहर आक्रमक आंदोलनाची भूमिका घेईल व त्याला सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जवाबदार राहील असे वक्तव्य भा.ज.यु.मो. विद्यार्थी आघाडी, नागपूर शहर संयोजक संकेत कुकडे यांनी केले.

भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या मार्गदर्शनात हे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने उपस्थित शहर संपर्कमंत्री मनीष मेश्राम, विद्यार्थी आघाडी नागपूर शहर संयोजक संकेत कुकडे, सह-संयोजक गौरव हरडे, सुभाष खेमानी, आशिष मोहिते, प्रणित पोचमपल्लीवार, आनंद गुप्ता, जतीन कनोजे, कौस्तुभ दाणी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.