Published On : Mon, Feb 24th, 2020

सकारात्मक बदलाची सुरुवात म्हणजे ‘मम्मी पापा यू टू’ : उपमहापौर मनीषा कोठे

Advertisement

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भरगच्च उपस्थित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

नागपूर, ता. २३ : शहरातील लोकांना चांगल्या सवयी लागाव्या यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेले ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाचा बक्षीस वितरण समारंभ म्हणजे समारोप नव्हे. तर सकारात्मक बदलाची ही सुरुवात आहे, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर मनीषा कोठे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्या वतीने १३ ते १९ जानेवारी दरम्यान ‘मम्मी पापा यू टू’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (ता. २३) कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. मंचावर मनपाच्या शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीच्या सदस्य प्रमिला मंथरानी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डीन डॉ. पंचभाई, शिक्षण उपसंचालकांचे प्रतिनिधी राम चव्हाण, उपशिक्षणाधिकारी उमेश राठोड, आय.टी. सेलचे केतन मोहितकर उपस्थित होते.

Advertisement

उपमहापौर मनीषा कोठे यांनी मम्मी पापा यू टू अभियानात सहभागी झालेल्या शाळांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एका उद्देशाला घेऊन नागपूर शहरातील शाळांनी एकाच वेळी सहभाग नोंदविलेले हे सर्वात मोठे अभियान असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला.

शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थ्यांसोबतच पालकही यात सहभागी झाले, ही भावी पिढीची शहराप्रती असलेली आत्मीयता दर्शविते. ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा केवळ निमित्त होते. यामाध्यमातून भावी पिढीकडून आजच्या पिढीला जो संदेश देण्यात आला, तो लाखमोलाचा आहे. काही अंशी का होईना, या अभियानामुळे नागरिकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. दरवर्षी असे अभियान राबविल्यास शहर सुंदर, स्वच्छ होण्यात नागरिकांचा सहभाग वाढेल, असेही ते म्हणाले.

शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी अभियान आयोजनामागील भूमिका विषद केली. अभियानात सुमारे तीन लाखांवर विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याचे त्यांनी सांगितले. महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून आकारास आलेले हे अभियान मनपातर्फे आतापर्यंत राबविण्यात आलेल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वकांक्षी अभियानापैकी एक होते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंचावर उपस्थित परिक्षक मनीषा महात्मे, नारायण जोशी, कल्पना वझलवार, नाना मिसाळ यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केंद्र मुख्याध्यापक टी.बी.आर. एस. मुंडले स्कूलच्या शुभांगी हिंगवे, सेंट उसुर्ला हायस्कूलच्या रचना सिंग आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी मा. शाळेचे संजय पुंड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वसुधा वैद्य यांनी तर बक्षीस वितरण समारोहाचे संचालन संध्या पवार यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपशिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर, संध्या पवार, विनय बगळे, नरेश चौधरी, भरत गोसावी, संजय दिघोरे, वसुधा वैद्य यांच्यासह सर्व शाळा निरिक्षक, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदींनी सहकार्य केले.

विविध स्पर्धांतील विजेते :

घोषवाक्य स्पर्धा (वर्ग ५ ते ८) : प्रथम – यशराज रहांगडाले (राधेश्याम उ.प्रा. शाळा, लालगंज), द्वितीय – अभिषेक काटेकर (महाराष्ट्र हायस्कूल, पावननगर), तृतीय- रहमती बानो (कपिलनगर हिंदी उ.प्रा. शाळा, मनपा).

घोषवाक्य स्पर्धा (वर्ग ९ ते १२) : प्रथम – प्रतीक जाधव (अरुणराव कलोडे मा.शाळा), द्वितीय – अर्पिता चुटके (भारत महिला मा. शाळा), तृतीय – निकिता बारई (दुर्गानगर मा. शाळा, मनपा).

वादविवाद स्पर्धा (वर्ग १ ते ८) : सकारात्मक बाजू : प्रथम – शंतनू दीपक अस्वार (शिशु विहार प्रा. शाळा), द्वितीय – सोनिया शर्मा (एम.के. एच. संचेती पब्लिक स्कूल), तृतीय – केतकी वानखेडे (बी.आर. मुंडले हायस्कूल). नकारात्मक बाजू : प्रथम – शुभम इंगळे (शिशु विहार प्रा.शाळा), द्वितीय – अमेया आदमने (एम.के. एच. संचेती पब्लिक स्कूल, तृतीय – जीत शेंडे (न्यू अपोस्टोलिक कॉन्व्हेंट).

वादविवाद स्पर्धा (वर्ग ९ ते १२) : सकारात्मक बाजू : प्रथम – पिंकी शुक्ला (लाल बहादुर शास्त्री हायस्कूल), द्वितीय – रक्षा चौधरी (पक्वासा हायस्कूल), तृतीय – जहीद अहमद (सेंट जॉन इंग्लिश स्कूल). नकारात्मक बाजू : प्रथम – कॅरिस फ्रान्सीस (सेंट जॉन इंग्लीश स्कूल), द्वितीय – रुपेश तिवारी (सिंधू महाविद्यालय), तृतीय – माधव कुलकर्णी (आर. एस. मुंडले हायस्कूल).

पथनाट्य स्पर्धा (माध्यमिक) : प्रथम – जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, द्वितीय – बाबा नानक सिंधी हायस्कूल, तृतीय – लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्य. शाळा, मनपा आणि केशवनगर हायस्कूल.

पथनाट्य स्पर्धा (प्राथमिक) : प्रथम – टी.बी.आर. एस. मुंडले स्कूल, द्वितीय – शिशुविहार उच्च प्रा. शाळा, मनपा, तृतीय – मकरधोकडा हिंदी उच्च प्रा. शाळा मनपा आणि माधवी उच्च प्रा. शाळा.

पालकांसाठी निबंध स्पर्धा : प्रथम – संजयकुमार यादव, द्वितीय – सरोज ढोले, तृतीय – कविता वैद्य.

चित्रकला स्पर्धा : प्रथम – सुहानी बावनकर (विवेकानंद पब्लिक स्कूल), द्वितीय – तेजस रुद्रकार, तृतीय – मैथिली घुशे, प्रोत्साहन – वंदना वाघमारे.