भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणरायांचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब श्रींची प्रतिष्ठापना व पूजन केले. श्री गणेशाचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंद व सुखाचे नवे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करताना श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
ते शुभेच्छा देताना म्हणाले की, महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सामाजिक एैक्याची व समाज प्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली एतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेताना नागरिकांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करावा. यंदाचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील माता, भगिणी व युवाशक्तीसाठी महत्वाचा आहे. निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा. सर्वांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पत्नी सौ. ज्योती, मुलगा संकेत, स्नुषा अनुष्का, नातीन काव्या, मुलगी सौ. पायल, जावई लोकेश आष्टनकर, नातू अधिराज व अविराज यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.
नागपुर में अवैध साहुकारी का खेल बेनकाब,
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 6 JULY 2026 #newsupdate...
मिसिंग लिंक की बदहाली पर तीखा हमला #maharashtranews #newsupdate #politicsnews #latestnews
आमगांव में घरों में घुसा बारिश का पानी #maharashtranews #barish #mansoon #nuksan
सीबीजी गैस पर वाहन चालकों का विरोध #maharashtranews #andolan #cnggas #wardhanews #newsupdate






