Published On : Sat, Nov 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

शब्दसृष्टीचे शिल्पकार म्हणजे लेखक, त्यांना मनःपूर्वक वंदन; डॉ. मोहन भागवत

नागपुरात‘भारत बोध’ सत्रात युवा लेखकांशी मनमोकळा संवाद
Advertisement

नागपूर – लेखन ही केवळ कला नसून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. शब्दांचा अयोग्य वापर झाला तर परिणामही प्रतिकूल होतात. त्यामुळे मानवकल्याण हेच साहित्याचे ध्येय असावे,” अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी साहित्यनिर्मात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

रेशीमबाग मैदानावर नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भरत असलेल्या ‘नागपूर पुस्तक महोत्सव 2025’ मध्ये शनिवारी ‘भारत बोध : युवा लेखक संवाद’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. देशभरातून सुमारे 300 युवा लेखकांनी या संवादाला हजेरी लावली.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रसंगी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रो. मिलिंद मराठे, झिरो माईल फाउंडेशनचे संचालक प्रशांत कुकडे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. भागवत यांच्या हस्ते पीएम युवा लेखक श्रेयस कोल्हेकर यांचा सत्कार करण्यात आला.

साहित्य म्हणजे उन्नतीचे साधन-
डॉ. भागवत म्हणाले की,
“लेखकाचे सृजन स्वहितापलिकडे समाजहिताचा मार्ग दाखवणारे असते. आपल्या साहित्याचे भाव कोणत्याही ‘इझम’मध्ये अडकत नाहीत. राष्ट्र हा आपल्यासाठी वादाचा मुद्दा नाही—तो अनुभूतीचा विषय आहे.”

भारतीय साहित्याचे विविध प्रादेशिक भाषांमधील भावांतर वाढले असले तरी आता ते विदेशी भाषांमध्ये पोहोचण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

ते पुढे म्हणाले ,राज्य, सत्ता किंवा विजयानंतर राष्ट्र निर्माण होत नाही. अहंकाराच्या विसर्जनातून जे उगम पावते तेच राष्ट्र. त्यामुळे साहित्य निर्माण करताना मूळ मूल्यांचा, परंपरेचा आणि अनुभूतीचा अभ्यास आवश्यक आहे.

‘ग्लोबलायझेशन’ हा केवळ आभास-

सत्रादरम्यान एआय, शिक्षणव्यवस्था, इतिहास, डिजिटल पिढी, जागतिकीकरण अशा ४८ प्रश्नांना उत्तर देताना डॉ. भागवत म्हणाले,“ग्लोबलायझेशन हा प्रत्यक्षात एक भ्रम आहे. तो एकमेकांवर विचार लादण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जगभर संघर्ष, युद्धे दिसतात.”

तरीही, संपर्क आणि दळणवळण सुलभ झाल्याचे त्यांनी मान्य केले.खरी जवळीक ‘वसुधैव कुटुंबकम’च्या भावनेत आहे, आणि ती भावना भारताची सनातन देणगी आहे,” असे त्यांनी नमूद केले.जेन-झी पिढीला उद्देशून त्यांनी राष्ट्राच्या परंपरा “मूळ स्रोतांकडून समजून घेण्याचे” आवाहन केले.

दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुष्मिता सिंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत कुकडे यांनी केले. झिरो माईल फाउंडेशनचे संचालक समय बनसोड, कल्याण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement