* ठराविक दिवशी काढता येणार रक्कम
* खातेधारकांनी सोशल डिस्टन्सींगचे भान राखावे
* बँकेत गर्दी करु नये
नागपूर : प्रधानमंत्री जन धन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जून 2020) प्रति महिना रुपये पाचशे इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी दिली आहे.
यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम 2 एप्रिल 2020 रोजी सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीमुळे बँक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहेत, असे श्री. नायक यांनी सांगितले.
त्यामध्ये उद्या, शुक्रवार (3 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 0 किंवा 1 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. तर मंगळवार (4 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 2 किंवा 3 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. 5 तारखेला रविवार आणि 6 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील.
तर मंगळवार (7 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 4 किंवा 5 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. बुधवार (8 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 6 किंवा 7 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. आणि सर्वात शेवटी म्हणजे पाचव्या दिवशी गुरुवारी (9एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 8 किंवा 9 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल, असेही श्री. नायक यांनी सांगितले आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





