Published On : Sat, Sep 14th, 2019

शिक्षण प्राप्त करणे हा सर्वांचा उद्देश असला पाहिजे… -अभिनेता शाहबाज खान.

कामठी : शिक्षण ही फार दुर्मिळ वस्तू आहे कठीण परिस्थितीतही शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता शिक्षण घेण्यासाठी विपरीत परिस्थितीवर मात करून शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन सिनेअभिनेता टिपू सुलतान फेम शहाबाद खान यांनी केले.

ते कामठी येथील इम्लीबाग समाज भवन येथे आयोजित मास्टर नूर मोहम्मद फाउंडेशन. विदर्भ मुस्लिम इंटलेक्च्युअल फोरम . अंजुमन जिया उल इस्लाम पब्लिक लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती जागरूकता या विषयावर हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश बशीर अहमद शेख व प्रमुख वक्ता कायदेतज्ञ डॉ फिरदोस मिर्झा यांनी विद्यार्थी व उपस्थितांना समयोचित असे मार्गदर्शन केले .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वक्फ बोर्डाचे रऊफ शेख, . माजी उपजिल्हाधिकारी वजाहत मिर्झा, आई एस शिक्षण तज्ञ डॉ मोहम्मद रफिक, डॉ शकील सत्तार यांनीसुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शकील डॉ निषाद संचालन रियाज सिद्दीकी यांनी केले तर आभार प्रदर्शन परवेज सिद्दिकी यांनी केले .

संदीप कांबळे कामठी